Bhosari : कर्जाच्या आमिषाने महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची तब्बल साडे बारा लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मंगळवारी (दि. 27) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

अनिता राजेश पासवान (वय 30, रा. हनुमाननगर, भगतवस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिता यांना डिसेंबर 2017 मध्ये एक फोन आला. त्यामध्ये फोनवरील समोरच्या व्यक्तीने बजाज फायनांसमधून बोलत असून तुम्हाला तुमच्या विम्यावर कर्ज मिळू शकते अशी बतावणी केली. फिर्यादी यांनी त्याला 28 लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ज मिळवून देण्यासाठी आरोपीने त्यांना शुल्क भरावे लागणार असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी डिसेंबर 2017 ते जुलै 2018 या कालावधीत तब्बल 12 लाख 66 हजार 250 रुपये संबंधित खात्यामध्ये ऑनलाईन हस्तांतरित केले. मात्र त्यानंतर कर्जासाठी पाठपुरावा केला असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.