Bhosari : सहा महिन्यात चोरली 15 लाखांची वीज; तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – मागील सहा महिन्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी केली. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषीकेश चंद्रकांत झगडे (सर्व रा. झगडे वस्ती, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्ये (वय 49, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 24 जुलै 2018 ते 25 जानेवारी 2019 या सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीजचोरी केली. 65 हजार 310 युनिट्स 15 लाख 63 हजार 930 रुपयांची वीजचोरी केल्याबद्दल भारतीय विद्युत कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.