Bhosari : सावत्र पित्याने केला 15 वर्षीय मुलीचा खून

एमपीसी न्यूज – सावत्र पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दापोडी येथे गुरुवारी रात्री उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुलीची बहीण गुरुवारी सायंकाळी शाळेतून घरी आली. त्यावेळी त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. मुलीने बराच वेळ घराच्या बाहेर थांबून वाट पाहिली. मात्र, कोणीच न आल्याने तिने कुलूप तोडले. दरवाजा उघडल्यानंतर तिला तिच्या बहिणीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

भोसरी पोलीस आरोपी पित्याच्या शोधात रवाना झाले आहेत. खून झालेल्या मुलीसोबत काही अघटित घडले असल्याची पुष्टी पोलिसांनी दिली नसून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ही बाब उघड होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

……………………

Bhosari : खून झालेल्या ‘त्या’ मुलीवर लैंगिक अत्याचार?
https://mpcnews.in/bhosari-sexually-assaulted-those-or-rape-on-minor-girl-126090/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.