Bhosari : एक क्विंटल गांजा जप्त; भोसरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – कारमधून गांजा घेऊन जाणा-या एकाला अटक करत त्याच्याकडून 101 किलो 125 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. 13) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली.

 

अतिक युनूस शेख (वय 27, रा. दिल्ली नाका, मोगल टेकडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रफिक शेख (रा. खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) पळून गेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बाळासाहेब गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी मधील ई क्षेत्रीय कार्यालायशेजारी इंद्रायणीनगरकडे जाणाऱ्या रोडवर एक कार थांबली असून त्यामध्ये गांजा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह एकाला ताब्यात घेतले. कारची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 101 किलो 125 ग्रॅम वजनाचा 15 लाख 16 हजार 875 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. यावरून अतिक शेख याला अटक करत गांजा जप्त करण्यात आला आहे. तर त्याचा दुसरा साथीदार पळून गेला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.