Bhosari : फेसबुकवर मैत्री करून दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- फेसबुकवर मैत्री करून महागडे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत महिलेला दोन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी सोमवारी (दि.8) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्योती रोजनिशी चौहान (वय 32, रा. मोशी, प्राधिकरण) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मेकॉन वायने (वय 40) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी व आरोपी यांच्यात फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत आरोपींनी आपापसात संगनमत करून त्यांना महागडे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. गीफ्टसाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. महिलेने 2 लाख 50 हजार रुपये ऑनलाईन हस्तांतरित केले. मात्र त्यानंतर फसवणूक झल्याचे लक्षात आले असता त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रारअर्ज दिला. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.