Bhosari: शाळेतील आठवणींना 22 वर्षांनी मिळाला उजाळा!

एमपीसी न्यूज – शाळेच्या आठवणी मनाच्या एका कोप-यात कायम ताज्या असतात. या आठवणींची नेहमीच ओढ असते याचाच प्रत्यय मोशी येथे आला. शाळा सोडून तब्बल 22 वर्षे झालेले मित्र-मैत्रीणी पुन्हा भेटले आणि त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला.

श्री नागेश्वर विद्यालय मोशीतील 1998-99 च्या बॅचच्या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम (दि.19) रोजी भोसरीतील हॉटेल क्लाउड नाईन येथे पार पडला. युवा उद्योजक संतोष बारणे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपआपली मनोगते व्यक्त केली.

संमेलनाच्या निमित्ताने संतोष बारणे(शैक्षणिक), रामदास बहिरट (सामाजिक), अमित शिवले (सामाजिक) तुषार आल्हाट (आध्यत्मिक) क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सारिका भुजबळ ,वनिता पवार, सुवर्णा भाडळे, सारिका बोराटे, चित्रा गुरव, कावेरी बनकर, रेणुका जाहिद, मनिषा हिंगणे, उज्वला हिंगणे, सुनिता आल्हाट, वैशाली बहिरट, सारिका बोबडे, अर्चना जाधव, रूपाली सस्ते, सोनी शेख, नीता बोराटे, सुरेखा आल्हाट, ऋषिकेश बोराटे, सचिन कुदळे, शरद वहिले, दयानंद आल्हाट, राकेश आल्हाट, प्रवीण बनकर, पंढरीनाथ जगताप, राजेंद्र हजारे, अनिल जाधव, भावेश पटेल, रवी अल्लाट, सचिन गीघे, अनिरुद्ध रॉय, योगेश लोखंडे, योगेश जाधव, तुषार भुसारी, अभिमन्यु सुरवसे, अमोल पवार, सचिन आल्हाट आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास कदम यांनी केली. चैत्राली बनकर-पांढरकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.