Bhosari: भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोघांचे उमेदवारी अर्ज बाद, 18 जणांचे 24 अर्ज पात्र

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्या पत्नी पूजा लांडगे यांचा डमी म्हणून दाखल केलेला आणि राजवीर दशरथ पवार या दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाला आहेत. भोसरीतील 18 उमेदवारांचे 24 अर्ज पात्र ठरले आहेत.

भोसरीतून 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले होते. यापैकी दोन उमेदवारांचे 3 अर्ज बाज झाले असून 24 अर्ज पात्र झाले आहेत. अर्ज माघार घेण्याची सोमवारपर्यंत मुदत आहे. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

‘यांचे’ अर्ज आहेत पात्र
महायुतीचे महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे पुरुस्कृत अपक्ष विलास लांडे, अपक्ष दत्ता साने, अपक्ष दत्तात्रय जगताप, समाजवादी पार्टीच्या वहिदा शहेनु शेख, बीआरएसपीचे ज्ञानेश्वर बो-हाटे, जनहित लोकशाही पार्टीचे विश्वास गजरमल, वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख, बहुजन मुक्ती पार्टीचे विजय आराख, महाराष्ट्र मजदूर पक्षाचे भाऊ अडागळे, बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र पवार.

अपक्ष अर्ज दाखल केलेले महेश दिलीप तांदळे, डॉ. मिलिंदराजे दिंगबर भोसले, हरेश बाजीराव डोळस, छाया संजय जगदाळे, मारुती गुंडाप्पा पवार, जालिंदर किसन शिंदे, विष्णू एकनाथ शेळके यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.