Bhosari: व्हॉट्सअपला स्टे्टस ठेवत 24 वर्षीय अभियंत्याची 11 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

Bhosari: 24-year-old engineer commits suicide by jumping from 11th floor while keeping WhatsApp status ज्या सोसायटीतील इमारतीवरून उडी घेत अक्षयने आत्महत्या केली, तिथे तो राहण्यास नव्हता.

एमपीसी न्यूज- मोशी येथे एका 24 वर्षीय अभियंत्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्याने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. परंतु, त्याने आत्महत्येपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवले होते, असे सांगण्यात येते. ज्या सोसायटीतील इमारतीवरून उडी घेत अक्षयने आत्महत्या केली, तिथे तो राहण्यास नव्हता.

अक्षय पोतदार (वय 24, रा. चिखली, साने चौक, मूळ गाव वाई, सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी आई, बाबा आणि बहिणीला सांभाळ मी दुसऱ्या जगात जात आहे, अशा आशयाचे व्हाट्सअ‍ॅप स्टेटस् ठेवल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अक्षय हा चिखली परिसरातील साने चौकात मित्रांसह राहत होता. तो एका खासगी कंपनीत अभियंता पदावर कार्यरत होता. बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोशी येथील ‘वुड्स व्हिला’ फेज तीन सोसायटीत तो आला. या इमारतीच्या गच्चीवर काम असल्याचे सुरक्षा रक्षकाला सांगत त्याने चावी मागितली.

सुरक्षा रक्षकाने चावी देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने दुसरा सुरक्षा रक्षक येताच इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये जायचे असल्याची नोंद करून त्याने इमारतीत प्रवेश केला.

त्यानंतर त्याने इमारतीच्या अकराव्या मजल्यावर जाऊन तेथून थेट खाली उडी घेऊन आत्महत्या केली. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like