Bhosari : दूरसंचार, वाहन उद्योग क्रांतीसाठी अँफॅनॉल कॉर्पोरेशनचे नवे तंत्रज्ञान

एमपीसी न्यूज- दूरसंचार आणि वाहन उद्योगात अँफॅनॉल कॉर्पोरेशन (यूएसए) नवे तंत्रज्ञान आणणार आहे. त्यासाठी कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड ऍडम नोव्हिट 14 फेब्रुवारी रोजी भोसरी येथील प्रकल्पाला भेट देणार आहेत. 1970 साली कंपनीचा भोसरी पुणे प्रकल्प सुरु झाला. हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यासंबंधी कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. कंपनीतर्फे बुधवारी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली.

‘अँफॅनॉल’ ही फॉर्च्युन 500 यादीमध्ये समाविष्ट असलेली इंटरकनेक्ट, सेन्सर, फायबर ऑप्टिक कनेक्टर्स, हाय स्पीड केबल्स तयार करणारी कंपनी आहे. भारतात कंपनीतर्फे दूरसंचार आणि वाहन उद्योगात प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान आणले गेले आहे. त्या निमित्ताने कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड ऍडम नोव्हिट 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता भोसरी प्लॅन्टला भेट देऊन कंपनीच्या भारतातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

इंटरकनेक्ट तंत्रज्ञान आणि उत्पादने तयार करणारी ही जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या उत्पादनांचे आरेखन, निर्मिती कंपनीद्वारे केली जाते. त्यात इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक-फायबर ऑप्टिक कनेक्टर्स,इंटर कनेक्ट सिस्टिम्स,अँटेना,हाय स्पीड केबल्स इत्यादी उत्पादनांचा समावेश आहे. उद्योग जगत, दूरसंचार उद्योग, वाहन उद्योग,विमान उद्योग,संरक्षण उद्योग,माहिती -तंत्रज्ञान उद्योगात कंपनीचे तंत्रज्ञान आणि उत्पादने वापरली जातात.

भारताच्या वाहन उद्योगात पारंपरिक आणि हायब्रीड -इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपनीने इंटरकनेक्ट आणि हायब्रीड तंत्रज्ञान विकसित केले आहे. वाहन उद्योगात क्रांतिकारी बदल होत असताना हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

कंपनीच्या नव्या, अद्ययावत संशोधन,तंत्रज्ञान आणि उत्पादनामुळे मोबाईल नेटवर्क, मोबाईल संच, डेटा कम्युनिकेशन क्षेत्रात वेगवान आणि क्रांतिकारी बदल होणार आहेत.’अँफेनॉल’ चा भोसरी (पुणे) येथील प्रकल्प 1970 आणि बंगळुरू मधील प्रकल्प 1989 मध्ये सुरु झाला. चेन्नई,दिल्ली येथेही कंपनीचा विस्तार झालेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.