Bhosari : भोसरी मध्ये 74 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – भोसरी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सिद्धेश्वर कॉलनी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

मोहन बजाबा जाधव (वय 63, रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. उतरोली, ता. भोर.) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 3 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी दोन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी जाधव यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.