Bhosari : भोसरी येथील उड्डाणपूलाखालून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील उड्डाणपुलाखाली पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 19 मार्च रोजी रात्री सव्वानाऊच्या सुमारास घडली.  याबाबत 1 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुनील नामदेव धुमाळ (वय 23, रा. धावडेवस्ती) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धुमाळ यांच्या आईच्या नावावर असलेली 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो मोटारसायकल (एमएच 14 / एफएच 9747) पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील उड्डाणपुलाखाली संत ज्ञानेश्वर मंगल कार्यालयाच्या सामोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.