Bhosari : वाईन शॉपमधील कामगाराच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

एमपीसी न्यूज – वाईन शॉपमध्ये काम करणा-या कामगाराच्या डोक्यात बिअरचे कॅन फोडून जखमी केले. ही घटना लकी वाईन शॉप दापोडी येथे रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास घडली.

बबन उद्धव आष्टे (वय 25, रा. पिंपळे गुरव) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल मारुती डगळे (वय 20, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील लकी वाईन शॉपमध्ये बबन काम करतात. रविवारी रात्री आरोपी राहुल त्यांच्या दुकानात आले. किरकोळ वादातून राहुल याने बबनच्या डोक्यात पाण्याचे आणि बिअरचे कॅन मारले. यामध्ये बबन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.