Bhosari : गाडीला धडक दिल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – गाडीला धडक देऊन गेल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला धडक देणा-या चालकाने मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना 23 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास यशवंतनगर चौक, टेल्को रोड भोसरी येथे घडली.

आकाश बाळू टेमगिरे (वय 22, रा. जांबे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम एच 12 / सी वाय 9182 वरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश सोमवारी रात्री टेल्को रोडने जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीला एम एच 12 / सी वाय 9182 या कारने धडक दिली. त्यानंतर कार चालकाने कार न थांबवता तिथून धूम ठोकली. त्याचा पाठलाग करून आकाश यांनी कार चालकाला थांबवून ‘गाडीला धडक देऊन गाडीचे नुकसान करून पळून का आलास ?’ असा जाब विचारला. यावरून आरोपी कार चालकाने मोठमोठ्याने शिवीगाळ करत आकाश यांना हातातील लोखंडी कड्याने मारहाण केली. यामध्ये आकाश जखमी झाले. भोसरी एमआयडीसी भोसरी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.