Bhosari : पावती फाडली म्हणून थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; धिंगाणा केल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – वाहतूक पोलिसांनी पावती फाडली म्हणून (Bhosari ) वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा आणला तसेच पोलीस ठाण्यातही आरडा-ओऱड करत गोंधळ घातला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24) नाशिक फाटा येथे घडला.
याप्रकरणी पोलीस नाईक बाबासाहेब पाखरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अश्वदिप पोपटलाल तारळकर (वय 24 रा.भोसरी) व महिला आरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Chinchwad : रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह दोघांना अटक; तीन पिस्टल तीन काडतुसे जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी वाहतूकीचा नियम मोडला म्हणून त्यांच्यावर दंड आकारला यावेळी तुम्ही पावती का फाडली म्हणत आरोपींनी हुज्जत (Bhosari ) घातली.
तसेच पोलीस निरीक्षकाच्या अंगावर हि धावून गेले. त्याना पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले असता शिवीगाळ करत फोनवर शुटींग काढली व ती सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यावरून आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.