Bhosari : महिलांच्या व्हॉटसअप डिपीचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलांच्या व्हॉटसअप डिपीवरील फोटोचा (Bhosari)गैरवापर करत अश्लिल फोटो प्रसारित करणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्हॉटसअप धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 27 जानेवारी ते 28 जानेवारी कालावधीत घडली.
Pune Crime news : दत्तवाडीतील जुगार अड्डयावर छापा, जुगार अड्डा मालकासह 15 जणांवर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तसेच त्यांच्या नणंद, चुलत नणंद व मावस बहिण यांच्या व्हॉटसअप डिपीवरील फोटो घेऊन त्याचे अश्लील फोटोमध्ये मॉर्फिंग करून (Bhosari) प्रसारित केल्याबद्दल आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.