Bhosari : मोपेड दुचाकीवरून गावठी दारु घेऊन जाणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून  गावठी हातभट्टीची दारु घेऊन जाणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून तीन लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई बोपोडी रोड, दापोडी येथे बुधवारी (दि. 8) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास करण्यात आली.

तेजस उर्फ सागर संजय गायकवाड (वय 24, रा. बोपोडी), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण अशोक शिंदे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तेजस याने त्याच्या  एमएच 14 / ई एस 9732 या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून  गावठी हातभट्टीची दारु वाहून नेली. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्या डिक्कीतून 30 प्लास्टिकच्या पिशव्यांमधून तीनशे रुपये किमतीची तीन लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. याबाबत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.