Bhosari : चोरून दारू विकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – देशी दारू आणि रम दारूची चोरून विक्री करत असलेल्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारवाडी येथे शनिवारी (दि. 11) सायंकाळी घडली.

महेंद्र सुदाम कदम (वय 30, रा. महात्मा फुले नगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी समीर लक्ष्मण रासकर यांनी शनिवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर चाळ, रेल्वे गेटजवळ कासारवाडी येथे एकजण दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा घालून पाच देशी दारूच्या बाटल्या, सहा रमच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण एक हजार 115 रुपयांचा माल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.