Bhosari : खिशातला मोबाईल घेतला म्हणून केला मित्राचा खून, बारा तासात आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – खिशातला फोन काढून (Bhosari) घेतल्याचा राग आल्याने त्याने चक्क मित्रालाच मारून टाकले. खून करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने 12 तासाच्या आत अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.26) मध्यरात्री भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडला आहे.

नारायण  वाघमारे असे मयत इसमाचे नाव असून याप्रकऱणी अमर ऊर्फ एक्क्या गौतम भोसले (वय 24 रा.भोसरी) याला अटक केली असून भगवान वसंत वाघमारे (वय 32 रा.भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसा ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ नारायण वाघमारे व त्याचा मित्र एक्क्या हे इंद्रायणीनगर येथील यशवंत चौक येथे बोलत उभा होते. नारायण याने मस्करीमध्ये एक्क्याचा फोन खिश्यातील फोन काढून घेतला. याचा राग येवून एक्क्याने नारायण याला हाताने मारहाण करत खाली पाडले  व डोक्य़ात दगड मारून गंभीर जखमी केले. त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

PCMC :  महापालिका देणार 18 लाखांचा सशस्रसेना ध्वज निधी

पोलीस आरोपीच्या मागावर असताना गुन्हे शाखा एकचे पोलीस हवालदार  खानविलकर व पोलीस नाईक मोरे यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आरोपी हा नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असून तो सध्या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकावर जात सापळा रचून आरोपीला अटक केले.सुरुवातीला आरोपीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला होता मात्र नारायण वाघमारे याचा ससून रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आरोपीवर गुन्ह्यात वाढ करत खूनाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

ही कारावाई गुन्हे शाखा एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार अमित खानविलकर, सचीन मोरे, प्रमोद गर्जे, मनोजकुमार कमले, मारुती जायभाये व टि.ए. डब्ल्यू विभागाचे नागेश (Bhosari) माली यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.