Bhosari : 40 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण आणि खून; मृतदेह आढळला विद्यापीठाच्या आवारात

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे 40 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाच्या मित्रांनीच अपहरण करून त्याचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, रविवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. तरुणाचा मृतदेह पुणे विद्यापीठाच्या परिसरात आढळून आला आहे.

अब्दुलअहत तयर सिद्धिकी (वय 17) असे अपहरण आणि खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सिद्धिकी यांचे वडील भोसरी येथे व्यवसाय करतात. तर मयत सिद्दिकी हा त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय सांभाळतो. शनिवारी रात्री सिद्धिकी याच्या मित्रांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या फोनवरून त्याच्या भावाच्या मित्रांना फोन करून खंडणीची मागणी केली.

घाबरलेल्या पालकांनी तात्काळ भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सिद्दीकी याचा शोध सुरू केला. आज पहाटे सिद्दीकी याचा मृतदेह पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Bhosari : मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याच्या समजातून मित्राचेच अपहरण आणि खून; संशयित आरोपी मित्राला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.