BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : आमदार महेश लांडगे, डॉ. अमोल कोल्हे यांची अचानक समोरासमोर भेट

आमदारांनी दिल्या  डॉ. कोल्हें यांना शुभेच्छा

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे  व आमदार महेश लांडगे हे अचानक आज सकाळी समोरासमोर आले. यावेळी दोघांमध्ये पाच मिनिटे चर्चा झाली. आमदारांनी डॉ. अमोल कोल्हे यांना हस्तांदोलन करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी आदी त्यांच्यासमवेत होते. डॉ. अमोल  कोल्हे यांचा आज, रविवारी भोसरी विधानसभा मतदार संघाचा गावभेट दौरा होता.
  • या दौ-याची सुरुवात करताना माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्या अगोदर आमदार महेश लांडगे यांची भेट झाली. यावेळी एकंदर प्रचाराबाबत चर्चा झाली.  दोघांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर पुढील नियोजित दौ-यासाठी डॉ. अमोल कोल्हे निघाले.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.