Bhosari : एमआयडीसी भोसरी येथे ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : एमआयडीसी भोसरी येथे (Bhosari) सायकलवरून जाणाऱ्य़ा 75 वर्षीय नागरिकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.24) सकाळी साडे आठ वाजता घडला.

याप्रकरणी बबन महादेव संगापुरे (वय 45 रा.भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ट्रक चालक रमजान यासीन शेख (वय 33 रा. निगडी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर या अपघातात महादेव गुंडाप्पा संगापुरे (वय 75 रा. भोसरी) यांचा मृत्यू झाला आहे.

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारी पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल हे (Bhosari) त्यांच्या सायकलवरून जास असताना आरोपी त्याच्या ताब्यातील टाटा ट्रक (एमएच 14 जीडी 8167) भरधाव वेगात घेऊन आला. त्याने महादे संगापुरे यांना पाठीमागून जोरात धडक दिली. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला. याचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.