Bhosari : चोरट्याने पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले!

एमपीसी न्यूज – मुलीला शाळेत सोडण्यासाठी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 83 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र आणि सोन्याची चेन चोरट्यांनी हिसकावून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 11) सकाळी साडेसात वाजता लांडेवाडी येथे शिवसृष्टी कॉर्नरवर घडली.

ऐश्वर्या प्रभू नायडू (वय 28, रा. लांडेवाडी, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नायडू त्यांच्या मुलाला शाळेत सोडविण्यासाठी लांडेवाडी येथील शिवसृष्टी चौकातून पायी चालत जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी नायडू यांच्या गळ्यातील तीन तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि एक सोन्याची चेन असा एकूण 83 हजार 500 रुपयांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला
जेवण झाल्यानंतर रस्त्याने चालत घरी जात असताना तरुणाच्या हातातून पल्सर दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने मोबाईल फोन हिसकावून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 9) रात्री पावणेदहाच्या सुमारास महेश नगर चौपाटी, संत तुकारामनगर पिंपरी येथे घडला. विकास तानाजी थोरात (वय 22, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 11) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.