Bhosari : बस प्रवासादरम्यान महिलेची सोन्याची बांगडी पळवली!

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान ज्येष्ठ महिलेच्या हातातील 15 हजारांची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेबाराच्या सुमारास बोपोडी ते भोसरी दरम्यान घडली.

गीताबाई श्रीपती लांडे (वय 72, रा. बोपोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी लांडे बोपोडी येथून पीएमपीएमएल बसने भोसरीकडे निघाल्या. बसमध्ये गर्दी होती. एक वाजता त्या भोसरी येथील पीएमटी बस स्टॉपयेथे उतरल्या.

बसमधून उतरत असताना त्यांच्या उजव्या हाताला टोचल्यासारखे झाले. त्यामुळे त्यांनी हाताकडे पाहिले असता त्यांच्या हातात सोन्याची बांगडी नव्हती. अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.