Bhosari : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

A young cyclist was killed in a collision with a tempo

एमपीसी न्यूज – भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दोन जुलै रोजी भोसरी येथील आळंदी रोडवर घडली.

ओंकार महादेव काटे (वय 21, रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल महादेव काटे (वय 21) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी एमएच 14 / जीयु 8588 या क्रमांकाच्या टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जुलै रोजी दुपारी सव्वा पाचच्या सुमारास ओंकार काटे दुचाकीवरून भोसरी येथील आळंदी रोडने जात होता. तो रेमंड शोरूम समोर आला असता समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने त्याच्या दुचाकीला समोरच्या बाजूने जोरदार धडक दिली.

या अपघातात ओंकार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.