Bhosari : शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ केली म्हणून जाब विचारला (Bhosari) असता दोघांनी हाताने व दगडाने मारहाण करत तरुणाला जखमी केले आहे. हि घटना बुधवारी (दि.22) भोसरी येथे घडली आहे.

या प्रकऱणी सौरभ अंकुश खानेकर (वय 18, रा.भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सनी शेटे (रा.दिघी), कुणाल आकलाडे (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Hinjawadi Crime News : कंपनीत घुसून महिलेला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र जगदीश श्रीवास्तव याच्यासह गप्पा मारत बसले असताना आरोपी तेथे आले व त्यांनी तू विराज फुगे याच्या गोठ्यावर का जात नाही? असे म्हणत शिवीगाळ केली.

शिवीगाळ का केली? म्हणून जाब विचारला असता आरोपींना फिर्यादिला मारहाण केली व (Bhosari) दगडाने डोक्यात मारत जखमी केले. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाअसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.