Bhosari : भागीदाराच्या वादातून तरुणाचे अपहरण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भागीदारीच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाचे अपहरण करण्यात आले. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. दत्ता माधवराव देवकाते (वय 27, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमर सोमेश्‍वर लाड, सचिन काशिद, मयुर व इतर दोघेजण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भागीदारीत व्यवसाय आहे. व्यावसायवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. शनिवारी (दि. 12) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या इंद्रायणीनगर येथील हॉटेलमध्ये काम करीत होते.

त्यावेळी आरोपींनी आपआपसांत संगनमत करून फिर्यादी यांच्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. फिर्यादी यांना जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून नेले. त्यानंतर मारहाण करून सोडून दिले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेडगे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.