BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari: कारच्या धडकेत पतीचा मृत्यू ; पत्नीची कारचालका विरोधात तक्रार

383
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने पोलिसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.

मनिशा दयानंद हिरे (वय 24, रा. भोसरी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे पती त्यांच्या अक्‍टीवा गाडीवरुन घरी जात होते. ते टेल्को रोड येथे आले असता एका वेरना कार (एमएच 14 / सीके 9018) चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. कार चालक घटनास्थळी न थांबता तेथून पळून गेला. जखमी हिरे यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.