BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्याने पायी चालत जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-नाशिक रस्ता पांजरपोळ येथे घडली.

दत्तात्रेय सावंत (वय 65, रा. पांजरपोळ, भोसरी) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल दत्तात्रेय सावंत (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दत्तात्रेय गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास पांजरपोळ येथे पुणे-नाशिक रस्त्याने चालत जात होते. त्यावेळी, भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. यामध्ये दत्तात्रेय गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.