Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत भोसरी येथे घडला. यातील आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने बुधवारी (दि. 21) अटक केली आहे.

विष्णू पंडित राठोड (वय 26, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी मंगळवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विष्णू याने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधली. त्यातून त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केला. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना खंडणी दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार निशांत काळे आणि पोलीस शिपाई राजेश कौशल्ये यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी विष्णू वल्लभनगर येथील अभिरुची स्कॅनिंग सेंटर समोर थांबला आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन विष्णू याला ताब्यात घेतले.

विष्णू याचा विवाह झाला आहे. विवाह झालेला असताना देखील त्याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीला पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.