Bhosari : ‘तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या’, पण सारखा फोन करु नका’

अजितदादांनी विलास लांडे यांना फोनवरुन ठणकावले !

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या पक्षाकडून की अपक्ष लढावे याबाबतचा घोळ अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरु होता. अर्ज भरण्यास दहा मिनिटे शिल्लक असताना भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना फोन केला. पण, अजितदादा इंदापूरच्या सभेत भाषण करत होते. पण, सातत्याने फोन येताच अजितदादांनी भाषण थांबवून लांडे यांचा फोन उचलला आणि ‘तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या’, असे स्पष्ट सांगितले.

फोन ठेवताच इंदापूरचे आणि विलास लांडे यांचे काही नाते आहे काही समजत नाही. मागेही असेच भाषण सुरु असताना फोन आला. त्यावेळी इंदापूरचा उमेदवार निवडून आला आणि हा पठ्ठा निवडून आला नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे एकच हशा उडाला.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादीकडून लढावे की अपक्ष लढावे याचा गोंधळ विलास लांडे यांचा सुरु होता. अर्ज भरायला दहा मिनिटे शिल्लक असताना त्यांना अजित पवार यांना फोन केला. परंतु, अजित पवार इंदापूर येथे सभेत भाषण करत होते. सारखा फोन येऊ लागल्याने अजित पवार यांनी अखेर भाषण थांबवल. फोन उचलला आणि ‘तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या’, असे स्पष्ट सांगितले.

विलास लांडे आता मला विचारत आहेत. अर्ज भरू का? शेवटची पाच मिनिटं उरली आहेत. इतके दिवस मी कुठं अडवलं होतं आणि विलास लांडे आणि इंदापूरचा काय संबंध आहे, हे मला समजले नाही. मागील वेळीही मी इंदापुरात आल्यानंतर मला असाच त्यांचा फोन येत होता. त्यावेळेसही माझं भाषण सोडून फोनवरील संभाषणच सगळ्या महाराष्ट्रात दाखवण्यात आले, असही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.