Bhosari : डॉ. अमोल कोल्हे यांना विजय मिळवून देण्यासाठी बंधू सागर कोल्हे मैदानात

एमपीसी न्यूज – शिरुर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आता त्यांचे धाकटे बंधू सागर कोल्हे हे देखील उतरले आहेत. डॉ. कोल्हे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यापासून कोल्हे कुटुंब प्रचार मोहिमांमध्ये वावरताना दिसत आहे.

सध्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी बैठका, रॅली, कोपरा सभा, मॉर्निंग वॉकचे सत्र सुरु आहे. आता सागर कोल्हे देखील बैठका, कोपरा सभा घेऊन मतदारांपर्यत पोहोचणार आहेत. सोशल मिडियात गुंतलेल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सागर कोल्हे खिंड लढविणार आहेत.

यासंदर्भात नुकतीच भोसरी येथे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू सागर कोल्हे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवक संजय वाबळे, विक्रांत लांडे, संजय उदावंत व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सागर कोल्हें म्हणाले की, जास्तीत जास्त मतदान डॉ. अमोल कोल्हे याना करण्यासाठी प्रयत्न करा. होम टू होम प्रचारावर भर द्या, प्रचारात कोणीही कमी पडता कामा नये, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, भोसरीमधून जास्तीत जास्त मतदान व्हायला पाहिजे अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.