Bhosari: टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू

Bhosari: An old man on a two-wheeler died in a collision with a tempo जोरदार धडक बसल्याने धीरेंद्र पांडे आणि मुलगी दोघेही रस्त्यावर पडले. पांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

एमपीसी न्यूज- भरधाव जाणा-या टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार वृद्धाचा गंभीर दुखापत होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 23 जानेवारी 2020 रोजी सकाळी कासारवाडी रेल्वे उड्डाणपुलावर घडली होती.

धीरेंद्र वल्लभ पांडे (वय 74) असे मृत्यू झालेल्या वृद्ध दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रीती धीरज पंत (वय 46, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जानेवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास फिर्यादींचे वडील धीरेंद्र पांडे हे फिर्यादीच्या मुलीला घेऊन डीवाय पाटील स्कूल येथून पिंपळे गुरव येथे दुचाकीवरून (एमएच 14 एफव्ही 6790) जात होते. कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलावर आले असता त्यांना एका टेम्पोने पाठीमागून धडक दिली.

जोरदार धडक बसल्याने धीरेंद्र पांडे आणि मुलगी दोघेही रस्त्यावर पडले. पांडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांच्यावर उपचारास सुरु असताना 20 जून रोजी दुपारी साडेचार वाजता पांडे यांचा मृत्यू झाला. याबाबत सोमवारी (दि.22) फिर्याद दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like