_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Bhosari :नाशिकफाटा येथील पुलावर दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू

An old man riding a two-wheeler died after hitting a divider on the bridge at Nashikphata

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना जुना पुणे-मुंबई महामार्गावर नाशिकफाटा येथील पुलावर रविवारी (दि. 7) रात्री घडली.

विठ्ठल किसन काची (वय 70, रा. अपूर्व हौसिंग सोसायटी, प्राधिकरण, निगडी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलीस कर्मचारी डी. जे. सावळे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 8) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल काची हे आपल्या दुचाकीवरून रविवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास चालले होते. ते नाशिकफाटा येथील पुलावर आले असताना भरधाव वेगातील त्यांची दुचाकी रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या काची यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.