Bhosari : खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून दोन सराईतांना अटक

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील तडीपार तर भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अशा दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने सोमवारी (दि. 19) भोसरी परिसरात केली.

चाँद गफूर शेख (वय 25, महात्मा फुलेनगर, भोसरी) आणि शुभम उर्फ दाद्या माने (वय 20, रा. साईनाथ कॉलनी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख हा सराईत गुन्हेगार आहे. तो तडीपार असूनही शहरात फिरत असल्याची खबर पोलीस कर्मचारी सागर शेडगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एमआयडीसी येथे सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. तडीपार कालावधीत पुणे जिल्ह्यात येण्याबाबत परवानगी आहे का, असे विचारले असता त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसल्याचे समजले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली.

दुसऱ्या कामगिरीमध्ये कर्मचारी नितीन खेसे यांना खबर मिळाली की, भोसरी पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यातील फरारी आरोपी माने हा शास्त्री चौक येथे आला आहे. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या मानेने गुन्हा काबुल कल्याने त्यास अटक करून पुढील तपास कामी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, किरण काटकर, सागर शेडगे, विक्रांत गायकवाड, महेश खांडे, किरण खेडकर, निशांत काळे, नितीन खेसे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.