Bhosari : बेकायदेशीररित्या विदेशी मद्य बाळगणा-यास अटक; 22 हजारांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात मद्यविक्रीसाठी बंदी असताना एकाने बेकायदेशीररित्या विक्रीसाठी मद्य बाळगले. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून त्याला अटक केली. त्याच्याकडून 22 हजार रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे.

बिपलब रामनाथ बर्मन (वय 33, रा. नुर कॉलनी, प्रियदर्शनी शाळेसमोर, दिघी रोड, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहे. या कालावधीत केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरू असून मद्य विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. सोमवारी (दि. 30) दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस भोसरी परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी भोसरी-आळंदी रोडवरील संभाजीनगर येथील राज पान स्टॉलवर छापा मारून पोलिसांनी बिपलब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 22 हजार 22 रुपये किमतीची विविध कंपन्यांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.