Bhosari : आशया कंपनीने केली चिप्स पॅकेटपासून सनग्लासेसची निर्मिती

एमपीसी न्यूज : ‘आशया’ या सोशल एंटरप्राइझने चिप्स पॅकेटवर प्रक्रिया (Bhosari) करून जगातील पहिली सनग्लासेसची जोडी लाँच केली आहे. या कंपनीची लॅब ही भोसरी एमआयडीसीमध्ये असून या कंपनीची स्थापना गेल्या आठवड्यात अनिश मालपाणी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली. अनिश या कल्पनेवर गेली 7 वर्षे काम आणि संशोधन करत आहेत.

अनिश मालपाणी यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) मध्ये झाला. ते बराच काळ दुबई आणि अमेरिकेमध्ये होते. तेथे ते एका फायनान्स कंपनीमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मनात एके दिवशी आले, की श्रीमंतांना श्रीमंत बनवण्यापेक्षा आपण वंचित जनतेसाठी काहीतरी करावे. आणि त्यातूनच ‘आशया’ला प्रारंभ झाला.

कंपनीचे नाव ‘आशया’ या संस्कृत शब्दावरून घेण्यात आले आहे, ज्याचा अर्थ उद्देश आणि दिशा आहे. जागतिक स्तरावर, पॅकेजिंगच्या जवळपास 0% अशी लक्षात न येणारी रक्कम रिसायकल केली जाते. आशयाने गेली दोन वर्षे पुण्यातील प्रयोगशाळेत प्रयोग करून संशोधन केले. पॅकेजिंगचा केवळ पुनर्वापर करण्याचाच नाही तर (Bhosari) पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग यातून त्यांना सापडला.

Pune Crime : जमिनीवर कारवाई होऊ नये म्हणून डेप्युटी इंजिनिअरला साडेतीन लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

भारतातील 50 ते 80 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नाही आणि एकूण कचऱ्यापैकी निम्मा कचरा तयार केलेल्या लँडफिल्समध्ये टाकला जातो. आशयाने पुण्यात स्वत:चे कचरा वेचक कामगार निवडले. त्याचा परिणाम म्हणजे कचरा ते बाजारापर्यंत संपूर्ण पुरवठा साखळी त्यांच्या नियंत्रणामध्ये आली. प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर बऱ्याच रासायनिक प्रक्रिया केल्यावर त्यातून ‘गॉगल’चा आविष्कार झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.