Bhosari : विनाकारण धारदार शस्त्राने तरूणावर वार; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मावस भावाला जेवणासाठी बोलविण्यास मावशीच्या घरी चाललेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री फुलेनगर मस्जिद जवळ घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवी दिलीप गाडेकर (वय 25, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी, भोसरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने  एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय मुळस्वामी, प्रतीक तायडे आणि विकास हंकर (पूर्ण नाव माहित नाही. रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी रवी हे आपल्या मावशीच्या घरी मावस भावाला जेवणासाठी बोलविण्यास चालले होते. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून त्यांना रस्त्यात अडवले. काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार करून रवी यांना जखमी केले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.