Bhosari : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका तरुणावर सत्तुरने वार करीत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी शांतीनगर, भोसरी येथे घडली.

अनिल साहेबराव गायकवाड (वय 27) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास जीवन गुंजाळ (वय 26, दोघेही रा. शांतीनगर, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुंजाळ याने फिर्यादी गायकवाड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र गायकवाड यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या गुंजाळ याने सत्तुरने गायकवाड यांच्यावर वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.