Bhosari Crime: जुन्या वादातून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज : जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. (Bhosari Crime) ही घटना सोमवारी (दि. 15) दुपारी बैलगाडा शर्यत आखाडा, भोसरी येथे घडली.

मोहन गोविंद तांबवडे (वय 24, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय विलास नागरे (वय 18), अभिषेक मारुती शिंदे (वय 18, दोघे रा. माणगाव, ता. मुळशी) यांना अटक केली आहे.

Blood donation: स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगावातील मोहर प्रतिमा संकुलामध्ये रक्तदान शिबीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यत आखाडा येथे आरोपींचा फिर्यादी यांच्या वडिलांसोबत शाब्दिक वाद झाला होता. (Bhosari Crime) त्या वादाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करत चाकूने छातीत भोसकले. यात ते गंभीर जखमी झाले. याबाबत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.