BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : संत निरंकारी मिशनच्या सत्संग सोहळ्यास अडीज हजार भाविकांची उपस्थिती

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनचे चौथे सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त समर्पण दिवस सत्संग सोहळा भोसरी येथे घेण्यात आला. हा सोहळा भोसरीतील संत निरंकारी सत्संग भवनात नुकताच झाला. या दिवशी बाबाजींच्या जीवन आणि शिकवणूकीतून प्रेरणा घेण्यासाठी २५०० हुन अधिक संत भाविक उपस्थिती होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक पंडित आबा गवळी उपस्थित होते.

यावेळी बजरंग चौधरी म्हणाले, बाबा हरदेवसिंहजी यांनी मानवता, विश्वबंधुत्व आणि भिंतीविरहित विश्वाच्या निर्मितीसाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. ते समकालीन सर्वोत्कृष्ट आणि सर्वाधिक उत्साही सत्याचे संदेशवाहक होते.

  • प्रत्येक व्यक्ती, समुदाय आणि राष्ट्राला त्यांचा अद्वितिय व प्रेरणादायी संदेश आपल्या वर्तमानकाळातील गरजांना अनुरुप वाटत होता. दिव्य ज्ञानाचा बोध करण्याव्यतिरिक्त मानवाच्या दैनंदिन भौतिक जीवनासाठीही ते सदोदित एक मार्गदर्शक प्रकाश बनून राहिले. त्यांची महान शिकवण जगाला सदोदित पथ प्रदर्शीत करीत राहील.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पन्हाळकर यांनी केले. आभार अंगद जाधव यांनी मानले.

HB_POST_END_FTR-A2