Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचारी महिला गंभीर

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जाणा-या महिलेला भरधाव वेगात मागे आलेल्या रिक्षाची धडक बसली. यामध्ये पादचारी महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास भोसरी येथे आळंदी बस स्टॉपजवळ झाला.

नितीन आनंदराव खैरनार (वय 34, रा. उत्सव होम, नाशिक-पुणे रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनंदा आनंद खैरनार (वय 55) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद यांच्या आई सुनंदा या रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी जात होत्या. भोसरी येथे आळंदी बस स्टॉपजवळ त्या आल्या असता एक रिक्षा (एम एच 12 / एच सी 5972) भरधाव वेगात मागे (रिवर्स) आली. सुनंदा यांना या रिक्षाची धडक बसली. या धडकेत त्या रस्त्यावर खाली पडल्या. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.