Bhosari: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाचे डोके फोडले

आरोपींनी गौड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गौड यांनी पैसे देण्यास नकार दिला.

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका दारुड्याने तरुणाचे दगड मारून डोके फोडले. ही घटना शनिवारी (दि.25) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली.

बिफुल विश्वनाथ गौड (वय 22, रा. लांडेवाडी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शकील खाजाभाई काझी (वय 31, रा. लांडेवाडी, भोसरी) आणि त्याचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नोकरी करतात. शनिवारी सकाळी आरोपी शकील आणि त्याचा एक साथीदार फिर्यादी गौड यांच्याकडे आले. आरोपींनी गौड यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. गौड यांनी पैसे देण्यास नकार दिला.

या कारणावरून आरोपींनी गौड यांना हाताने तसेच दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गौड यांचे डोके फुटले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.