Bhosari : पंक्चर काढण्यासाठी जास्त पैसे घेतल्याने कामगारास मारहाण

Beating a worker for taking too much money to remove a puncture

एमपीसी न्यूज – पंक्‍चर काढणाऱ्या दुकानदाराने महिलेकडून जादा पैसे घेतले. या कारणावरून चार जणांनी दुकानातील कामगारास मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 23) सायंकाळी भोसरी येथे घडली.

रितेश बनवारी राम (वय 26, रा. यशवंत नगर चौक, एमआयडीसी, भोसरी) यांनी बुधवारी (दि. 24) याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चार अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेची दुचाकी पंक्‍चर झाल्यानंतर फिर्यादी रितेश यांनी त्या कामासाठी 400 रुपये मजुरी घेतली. या कारणावरून चार अनोळखी व्यक्‍तीनी पंक्‍चर दुकानात येऊन रितेश यांना रिंग पान्ह्याने मारहाण करून जखमी केले.

तसेच दुकानाच्या मालकाला स्क्रू डाइव्हरने मारण्याचा प्रयत्न केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.