BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : विनायक रेसिडेन्सीमधील सदनिका म्हणजे गुणवत्ता आणि दर्जा यांचा सुयोग्य मेळ

एमपीसी न्यूज- भोसरी येथील विनायक रेसिडेन्सी या आदर्श व सुंदर गृहप्रकल्पात एक व दोन बेडरुम किचनचे फ्लॅट असून एल. पी. लॅंडमार्क या नामांकित समूहातर्फे हा प्रकल्प आकारात येत आहे. दर्जा व गुणवत्ता राखून परवडणा-या दरातील घरे आमच्या ग्राहकांना देताना आम्ही कोठेही गुणवत्तेशी तडजोड केली नसून आम्ही पारदर्शकता आणि सचोटीवर कायम विश्वास ठेवतो. त्यामुळे या प्रकल्पातील घरांमध्ये उत्कृष्ट दर्जा, योग्य किंमत आणि गुणवत्ता या सर्व बाबींचा योग्य तो मेळ घालण्यात आला आहे.

शांत वातावरण आणि आनंदात आपले आयुष्य व्यतीत करावे ही प्रत्येकाचीच मनातील इच्छा असते. त्यासाठी आपण आपल्या पसंतीचे घर शोधत असतो. अशा वेळी भोसरी येथील विनायक रेसिडेन्सी मधील टुमदार फ्लॅट म्हणजे सुखाला लागलेले चार चांदच. प्रशस्त आणि उत्तम आरेखन असलेल्या या सदनिका आपल्या सर्व गरजा भागवण्यासाठी अगदी आदर्श आहेत. पुरेसा प्रकाश आणि खेळते वातावरण हा या सदनिकांचा हुकुमाचा एक्का आहे. सध्याच्या आधुनिक युगासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधांचा या सदनिकांमध्ये अंतर्भाव केलेला आहे. उत्तम रंगसंगती, देखणे दरवाजे व खिडक्या, अंतर्गत प्लंबिगची व्यवस्था, टी.व्ही व टेलिफोनसाठी पॉईंट, आकर्षक सिरामिक टाइल्स, फायरफायटिंग सिस्टिम, मुख्य बेडरुममध्ये एसी पॉईंट यासारख्या सर्व सुविधा या सदनिकांमध्ये देण्यात आल्या आहेत.

मुलांच्या खेळण्यासाठी जागा व मिनि अॅम्फिथिएटर, लॅन्डस्केप गार्डन, सुंदर व आकर्षक बैठकव्यवस्था, भरपूर व मुबलक पार्किंग, देखणे प्रवेशद्वार, लिफ्ट व कॉमन भागात बॅटरी बॅकअप, सुरक्षाकेबिन, कच-याची योग्य विल्हेवाट, अद्ययावत सोलर वॉटर, फायर फायटिंग सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिमेंट कॉन्क्रिटचे अंतर्गत रस्ते अशा सध्याच्या आधुनिक काळाला अनुसरुन सर्व अत्यावश्यक सुविधा विनायक रेसिडेन्सी या प्रकल्पात देण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन गरजेच्या सर्व सुविधा म्हणजे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, बॅंक,बाजारपेठ, बसस्टॅंड येथून जवळच आहेत. मग वाट कसली बघताय? विनायक रेसिडेन्सी या देखण्या आणि आदर्श गृहप्रकल्पात घर बुक करण्याची सुवर्णसंधी अजिबात हातची जाऊ देऊ नका. विनायक रेसिडेन्सीमधील सदनिका धारकांच्या चेह-यावरील हसू कायम टवटवीत राहते. ते कमी होण्याची संधीच दिली जात नाही.

प्रकल्पाचा पत्ता – विनायक रेसिडेन्सी, सर्व्हे नं. 230/1, धोंडिबा फुगे उद्यानासमोर,(विरंगुळा केंद्र)
भोसरी, पुणे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधावा –
91 7741009009, 88888 11666

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like