Bhosari: भोसरीत गुरुवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणा-या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे येत्या गुरुवारी (दि.20) वितरण केले जाणार आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी दुपारी तीन वाजता पुरस्कार सोहळा होणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आदर्श शिक्षक पुरस्काराने पालिकेने अर्ज मागविले होते. त्यासाठी एकूण 63 अर्ज आले होते. पुरस्काराच्या निकषानुसार आदर्श शिक्षकांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.