Bhosari : पूरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसाठी भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघातर्फे डॉक्टरांचे पथक रवाना

तज्ज्ञ डॉक्टरांकडून पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी

एमपीसी न्यूज -पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठविले आहे. यात दोन रुग्णवाहिका आणि तीन हजार कुटुबियांसाठी लागणारी सहा लाख रुपये किमतीची औषधे आणि 150 लोकांची टीम कोल्हापूर, सांगलीला गेली असून अहोरात्र पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळू लागली असून आता जलजन्य आजारांचा संसर्ग पसरण्याची भिती आहे. पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी रवाना झालेले डॉक्टरांचे पथक कोल्हापूर व सांगलीतील नागरिकांची अहोरात्र आरोग्य तपासणी करत आहेत. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव देखील हजर आहेत. महापौर जाधव हे जातीने लक्ष घालून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करुन घेत आहेत.

  • भैरवनाथ कबड्डी संघाचे अध्यक्ष योगेश लांडगे म्हणाले, ”कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला असून डॉक्टर, औषधांची आवश्यकता होती. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 12 तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठविले आहे.

दोन रुग्णवाहिका आणि तीन हजार कुटुबियांसाठी लागणारी सहा लाख रुपये किमतीची औषधे पाठविली आहेत. 150 कुशल मनुष्यबळ देखील मदतीला पाठविले आहे. रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यासाठी डॉक्टरांचे हे पथक दिवसरात्र मेहनत घेत आहेत’, असेही लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.