Bhosari : भोसरी मतदारसंघातील जनतेचे आभार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार, अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.

भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चौदाव्या फेरीअंती 1 लाख 6 हजार 126 मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 57 हजार 549 मते मिळाली. महेश लांडगे चौदाव्या फेरीअंती 48 हजार 577 मतांनी आघाडीवर होते. विजयाकडे त्यांची वाटचाल सुरू झाल्याने सर्व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. आम्ही दूरदृष्टी ठेऊन मागील पाच वर्षात काम केले आहे. दिलेल्या कमिटमेंटनुसार काम केले असून पुढील कालावधीचे देखील व्हिजन ठरवण्यात आले आहे. त्यानुसार पुढील काम चालू राहणार आहे. वाढते शहरीकरण आणि भेडसावणाऱ्या समस्या ओळखून त्यावर काम सुरू आहे” असे लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.