Bhosari : महेश लांडगेच निवडून येणार; दिघी मधील ज्येष्ठ नागरिकांचा निर्धार

एमपीसी न्यूज- दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेश लांडगे यांच्या उमेदवारीचे स्वागत केले. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे हेच विजयी होणार, असा निर्धार दिघी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केला. आमदार महेश लांडगे यांना निवडणुकीसाठी त्यांनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.

भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दिघी गावठाण मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आमदार लांडे यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली. तसेच संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाला भेट दिली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण गोडसे गुरुजी, दत्तात्रय गायकवाड, विनायकराव गायकवाड, कृष्णकांत वाळके, संतोष वाळके, रामदास परांडे, आनंदा घुले, नगरसेवक लक्ष्मण मुंडे, हिरानानी घुले, विकास डोळस, निर्मला गायकवाड, संजय गायकवाड, दत्तात्रय पारंडे, रामदास कुंभार, उदय गायकवाड, दत्ता वाळके आदी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे हेच पुन्हा एकदा निवडून यावेत ही ग्रामस्थांची इच्छा आहे. सर्व ग्रामस्थ भरघोस मतांनी त्यांना निवडून देणार आहेत. ज्येष्ठ नागरिक देखील आमदार लांडे यांच्या प्रचारात उतरणार आहेत, असे जेष्ठ नागरिकांनी सांगितले. आमदार महेश लांडगे यांनी आजवर राजकारण नाही तर समाजकारण केले दिघी गावठाणचा रस्ता 100 शंभर फूट करणे असेल किंवा यासारखे अनेक प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न एकाच बैठकीत त्यांनी सोडविले आहेत. अशा सर्वसामान्यांच्या नेतृत्वाला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी दिघीकर प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “आपला उत्साह आणि विश्वास आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रवृत्त करतो. आपले आशीर्वाद आणि कौतुकाची थाप कायम पाठीवर राहिलेली आहे. या पुढील काळात देखील ही कौतुकाची थाप कायम पाठीवर राहील ही अपेक्षा आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like