Bhosari : विनाकारण मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- काहीही कारण नसताना एका तरुणास चार जणांनी मारहाण करीत जखमी केले. ही घटना भोसरीतील महात्मा फुलेनगर भागात घडली.

मंजुनाथ हनुमंत उकली (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. 14) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी सुरज ऊर्फ डिप्शा महादेव गायकवाड, विशाल मुन्नीलाल राजभर (दोघेही रा. महात्मा फुले नगर, भोसरी), अविनाश बाळु मानवतकर (रा. गुंजाळवस्ती, विश्रांतवाडी, पुणे), जावेद लालसाब नदाफ (रा. चिंचवड), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून आरोपी अविनाश याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून काहीही कारण नसताना फिर्यादी हाताने तसेच फरशी डोक्‍यात घालून गंभीर जखमी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांचाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.