Bhosari: भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार ही खात्री – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज – देशातील लाटेच्या विरोधात जाऊन शिरुरचा वेगळा निकाल लागला आहे. मागील निवडणुकीपेक्षा भोसरीतून विरोधकांचे 50 हजारांनी मताधिक्य कमी केले आहे. त्यामुळे कोणाला काहीही शंका असेल. परंतु, मला खात्री आहे, भोसरीचा आमदार राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज (गुरुवारी) व्यक्त केला

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, एखादा इच्छुक पदाधिकारी मुलाखातीला गेला नाही म्हणजे तो पक्षासोबत नाही, असे होत नाही. काही कारणांमुळे मुलाखतीला जाता येत नाही. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुलाखत देता आली नव्हती. परंतु, नाहकपणे संशयाचे वातावरण तयार केले जाते.

  • राष्ट्रवादीच्या होत असलेल्या गळतीवर बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, जे गेलेत त्यांच्याविषयी वाईट बोलण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तनाच्या मोठ्या टप्प्यावर आहे. पक्षात नवीन नेतृत्व तयार होत आहे. ही बदलाची वेळ आहे. या बदलासाठी पक्षाचे कार्यकर्ते जिद्दीने पेटले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते आजही पवारसाहेबांसोबत आहेत, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.